कोल्हापूर:(प्रतिनिधी )प्रियंका शिर्के-पाटील
पन्हाळा तालुक्यातील कणेरी प्राथमिक शाळेचा वरांडा जनु शिक्षकांच्या गाडीचे पार्किंग बनले आहे. शासनाने सर्वप्रथम शाळांचे बांधकाम सुरू केले त्यावेळी उन्हाळ्यात अथवा पावसाळ्यामध्ये मुलांना पटांगणावर उन्हात अथवा भिजत उभे न राहता या वरांड्याचा वापर करावा तसेच शैक्षणिक कार्यक्रम सर्व विद्यार्थ्यांना एकत्रित करून शाळेच्या वरांड्यात घ्यावे हा उद्देश ठेवून वरांडा बांधण्यात आला होता.
पण येथील शिक्षकांनी या वरांड्याला तर आपल्या गाडीचे पार्किंग शेडच बनवले असल्याचे पहावयास मिळत आहे. या ठिकाणी इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शाळा असून 85 ते 90 च्या आसपास विद्यार्थी पटसंख्या आहे तर पाच शिक्षक कार्यरत असून या गाड्या पार्किंगमुळे विद्यार्थ्यांना वरांडाचा वापर करता येत नाही. तर काही शिक्षक मात्र आपला तोरा मिरवत सांगतात की गाडी लावायला जागा नाही मग कुठे लावायची गाडी यावरून मात्र मुलांना खेळण्या-बागडण्यांच्या जागेवरही आता गाड्या पार्किंग झाल्यामुळे आणि याच शाळेला मैदान कमी असल्यामुळे मुलांची खेळण्याची मोठी गोची झाली आहे.