फोनवर हा लाइट दिसतोय तर सावधान! कोणीतरी करतंय स्क्रीन रेकॉर्ड, बदला ही सेटिंग

0
122

फोनची गरज ही सतत वाढत चालली आहे. यामुळे आवश्यक कामं आता सोपी झालीयेत. फोन सोबत असल्याने आवश्यक डॉक्यूमेंटची हार्ट कॉपी सोबत ठेवावी लागत नाही. फोनमध्ये उपलब्ध सॉफ्ट कॉपीनेच काम होतं.

मात्र जशजशा गोष्टी सोप्या होताय. तसंच हॅकिंगचा धोकाही वाढतोय.

फसवणूक करणारे दिवसेंदिवस विविध युक्त्यांनी आपली पर्सनल माहिती हॅक करत आहेत. यामुळे फोन सिक्योर करणं गरजेचं आहे. हॅकिंगच्या नवनवीन पद्धती आपल्याला नेहमीच कळत असतात. पण आता हॅकर्सने आणखी एक नवीन पद्धत शोधली आहे.

यामध्ये हॅकर्स यूझर्सची फोन स्क्रीन गुपचूप रेकॉर्ड करतात. चकीत करणारी गोष्ट म्हणजे, ज्यावेळी फोनची स्क्रीन रेकॉर्ड होत असते तेव्हा यूझर्सला कळत नाही आणि फसवणूक करणारे डेटा चोरी करुन आपली फसवणूक करतात. फोनमध्ये आपला एवढा जास्त पर्सनल डेटा असतो की, हॅकर्सने आपल्या फोनला हात लावू नये याची भीती आपल्याला असते.

अशावेळी प्रश्न उपस्थित होतो की, कोणी आपली स्क्रिन रेकॉर्ड करत असेल तर याची माहिती आपल्याला कशी मिळेल. याची माहिती मिळवणं सोपं नाही. पण काही फोनमध्ये असे फीचर्स दिले जातात. ज्यामुळे तुमचा कॅमेरा किंवा माइक वापरला जात असेल तर ग्रीन कलरचा लाइट लागण्यास सुरुवात होते.

ग्रीन डॉट एक असा टूल आहे, ज्यामध्ये तुम्हाला कळू शकते की, एखादं अॅप्लिकेशन सध्या तुमच्या डिव्हाइसच्या कॅमेरा किंवा मायक्रोफोनचा वापर करत आहे.

तुमच्या फोनवर स्क्रिन रेकॉर्ड होत असेल किंवा कॅमेराचा वापर केला जात असेल तर तुमच्या फोनच्या राइट साइडवर ग्रीन कलरचा लाइट दिसू लागेल. तुम्ही स्वतः रेकॉर्ड करत असाल किंवा मायक्रोफोनचा वापर करत असाल तर टेन्शन नाही. पण तुम्ही वापरत नसाल आणि तरीही लाइट ऑन असेल तर दुसरंच कोणीतरी तुमची स्क्रिन रेकॉर्ड करत आहे.

तुमची स्क्रिन रेकॉर्ड होतेय असं तुम्हाला दिसलं तर कोणत्या अ‍ॅपवरुन रेकॉर्डिंग होतेय ते आधी पाहा. कळाल्यावर लगेच ते अ‍ॅप डिलीट करा. यासोबतच दुसरी पद्धत म्हणजे, लगेच तुमचा फोन रिसेट करा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here