कोल्हापूर जिल्ह्यात दारुचा महापूर,१० कोटी ७१ लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त

0
97


प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापूर : विधानसभा निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यानंतर राज्यात चांदा ते बांदा अवैध मुद्देमाल जप्त करण्याचा धडाकाच सुरुच असून कोल्हापूर जिल्ह्यातही मोठी कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत स्थिर सर्वेक्षण पथक राज्य पोलीस दल, राज्य उत्पादन शुक्ल विभाग, राज्य वस्तु व सेवा कर विभागाकडून या कारवाईमध्ये आतापर्यंत १० कोटी ७१ लाखांचा अवैद्य मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील १० विधानसभा मतदारसंघापैंकी सर्वाधिक दारु जप्तीची कारवाई कोल्हापूर दक्षिण, करवीर, राधानगरी आणि चंदगड विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक दारु जप्त करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here