प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा. कोल्हापूर :राज्यात थंडीची चाहूल लागली असतानाच पावसाचे सावट आले आहे. आज राज्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे हवामान विभागाने १५ जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडे सरकताच राज्यात पावसाचा जोर कमी होईल, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान लवकरच राज्यात गुलाबी थंडी येईल, असा हवामान विभागाने अंदाज वर्तवला होता. पण पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचं हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. राज्यात पुढील दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी वादळी वारे, विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात आज अनेक ठिकाणी ढगाळ वातावऱण राहण्याची शक्यता आहे. ढगाळ हवामानामुळे राज्यात उन्हाचा चटका कमी-अधिक होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.वादळी वारा आणि विजांसह १५ जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यता आली आहे. पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, धुळे, नाशिक, नगर, पुणे, सातारा, कोल्हापूर, बुलढाणा, वाशीम, चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.