मराठी गाण्याच्या रिमेकवर थिरकणं नोराला पडलं महागात; ‘ब्रिंग इट ऑन’चा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

0
141
मराठी गाण्याच्या रिमेकवर थिरकणं नोराला पडलं महागात; 'ब्रिंग इट ऑन'चा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी केलं ट्रोल

अजय-अतुल गोगावले हे सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक आहेत. अनेक सुपरहिट गाणी त्यांनी दिली आहेत. केवळ मराठीतच नाही तर बॉलिवूडमध्येही अजय-अतुल यांनी नाव कमावलं आहे. त्यांच्या अनेक मराठीत हिट ठरलेल्या गाण्यांचे बॉलिवूडमध्येही रिमेकही झाले आहेत.

आता ‘बेबी ब्रिंग इन ऑन’ या अजय-अतुलच्या सुपरहिट गाण्याचा बॉलिवूड रिमेक करण्यात आला आहे. ‘मडगाव एक्सप्रेस’ या सिनेमातील हे गाणं नुकतंच प्रदर्शित करण्यात आलं आहे.

‘ब्रिंग इट ऑन’ या गाण्यात बॉलिवूड अभिनेत्री नोरा फतेही डान्स करताना दिसत आहे. अगदी मराठीप्रमाणेच हे गाणंही शूट करण्यात आलं आहे. ढोल, लेझीम आणि मराठमोळा ठसका या गाण्याला दिलेला पाहायला मिळत आहे. अजय-अतुलनेच या गाण्याला आवाज दिला आहे. अवघ्या काही दिवसांतच या गाण्याला मिलियनमध्ये व्ह्यूज मिळाले आहेत. पण, हे गाणं प्रेक्षकांना फारसं पसंतीस न उतरल्याचं प्रेक्षकांना पाहायला मिळतं. या गाण्यावर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here