महाराष्ट्र राज्य सात वर्षाखालील मुलांच्या निवड बुद्धिबळ स्पर्धामुंबईच्या गिरीषा पै व लक्ष दिघे ला अजिंक्यपद तर नंदुरबारची नारायणी मराठे व नागपूरचा स्वराज मिश्राला उपविजेतेपद..

0
70

कोल्राहापूर /प्रतिनिधी : राजेंद्र मकोटे

कोल्हापूर रविवार दि.27 ऑगस्ट :- पोद्दार इंटरनॅशनल स्कूल,नवा वाशी नाका,कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केलेल्या सात वर्षाखालील मुला मुलींच्या महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा आज संपन्न झाल्या.
अंतिम आठव्या फेरीमध्ये मुलांच्या गटात पहिल्या पटावर आघाडीवर असलेल्या नागपूरच्या स्वराज मिश्राने ठाण्याच्या दर्श राऊतला पराभूत केले तर दुसऱ्या पटावर आघाडीवर असलेल्या मुंबईच्या लक्ष दिघेने नागपूरच्या अर्णव कुंचलवार वर मात केली.विजय झालेल्या लक्ष दिघे व स्वराज मिश्रा या दोघांचे समान साडेसात गुण झाल्यामुळे बुकोल्स टायब्रेक गुणानुसार लक्षला अजिंक्यपद मिळाले तर स्वराज्यला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले.लक्षला रोख दोन हजार रुपये व चषक तर स्वराज्याला रोख पंधराशे रुपये व चषक देऊन गौरविले.


मुलींच्या गटात पहिल्या पटावर सात गुणासह आघाडीवर असलेल्या मुंबईच्या गिरीषा पै ने सातारच्या रिवा चरणकर वर मात करीत आठ गुणासह निर्विवादपणे अजिंक्यपद पटकाविले.गिरीषाला रोख दोन हजार रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले.दुसऱ्या पटावर अग्रमानांकित नंदुरबारच्या नारायणी मराठे ने औरंगाबादच्या स्वरा लढ्ढावर विजय मिळवला व सात गुणासह उपविजेतेपद पटकाविले तिला रोख पंधराशे रुपये व चषक देऊन सन्मानित केले. आयुर्विमा महामंडळ, अयोध्या फाउंडेशन, बँक ऑफ महाराष्ट्र व एस्,बी.रिसेलर्स यांनी या स्पर्धा पुरस्कृत केल्या होत्या.
या स्पर्धेतून खालील दोन मुलांची व तीन मुलींची निवड सात वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ करण्यात आली आहे. सात वर्षाखालील राष्ट्रीय निवड बुद्धिबळ स्पर्धा दि.21 ते 25 सप्टेंबर दरम्यान कलकत्ता येथे होणार आहेत.
मुले :- 1) लक्ष दिघे मुंबई 2) स्वराज मिश्रा नागपूर
मुली :- 1) गिरीषा पै मुंबई 2) नारायणी मराठे नंदुरबार 3) नित्या बंग मुंबई
स्पर्धेचा बक्षीस समारंभ पोदार इंटरनॅशनल स्कूल व ज्यु.कॉलेजच्या उपप्राचार्या मनीषा आमराळे, आयुर्विमा महामंडळाचे वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी व्यासपीठावर धनंजय इनामदार, मुख्य पंच पुण्याचे नितीन शेणवी,पोदार स्कूलचे ॲडमिन सुरेश देसाई,क्रीडा समन्वयक संजय चिले व उदय पाटील, महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे सहसचिव भरत चौगुले व निरीक्षक राजु सोनेचा, मुख्य स्पर्धा संयोजक मनीष मारुलकर,धीरज वैद्य,आदित्य आळतेकर व अमित मोदी उपस्थित होते.अभिजीत परब यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. पुण्याचे आंतरराष्ट्रीय पंच नितीन शेणवी यांनी मुख्य पंच म्हणून काम पाहिले त्यांना करण परीट, आरती मोदी, सूर्याजी भोसले व रोहित पोळ यांनी सहाय्य केले.पोदार स्कूल व ज्यु.कॉलेज च्या प्राचार्या शिल्पा कपूर व त्यांच्या सहकार्यानी विशेष परिश्रम घेतल्यामुळे स्पर्धा यशस्वी झाली. मुले व मुलींच्या दोन्ही गटात पहिल्या 10 क्रमांकांना रोख बक्षिसे व चषक देण्यात आला.
1) लक्ष दिघे मुंबई 2) स्वराज मिश्रा नागपूर 3) दर्श राऊत ठाणे 4) विहान शहा पुणे 5) कृष्णा मुरकुटे नागपूर 6) ओम गाणू मुंबई 7) नोवा अय्यर जुएल 8) हेयान रेड्डी पुणे 9) प्रज्ञेश घोरपडे सातारा 10) अर्णव कुंचलवार नागपूर
मुली :- 1) गिरीषा पै मुंबई 2) नारायणी मराठे नंदुरबार 3) नित्या बंग मुंबई 4) स्वरा बोरखडे नागपूर 5) आबा फाळके चंद्रपूर 6) मिष्का त्रिपाठी ठाणे 7) भूमी धगधगे नंदुरबार 8) त्विशा नोवीन मुंबई 9) अनिष्का बियाणी मुंबई 10) रिवा चरणकर सातारा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here