विशाळगड :मौ.गजापूर पैकी मुसलमानवाडी ता. शाहुवाडी येथील पिडिताना मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी व घर दुरुस्तीसाठी शासनाकडून मदतीचे वाटप

0
257

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : विशालगड येथील मौ. गजापूर पैकी मुसलमानवाडी ता. शाहुवाडी या गावामध्ये रविवार दि. १४ जुलै २०२४ रोजी किल्ले विशाळगड अतिक्रमण मुक्त बाबतच्या मोर्च्यावेळी हिंसाचाराने मोठे नुकसान झालेले होते. मुसलमानवाडी या येथील अंदाजे ४१ घरांची जमावाने नासधुस करुन प्रापंचिक साहित्यांचे मोठे नुकसान केलेले होते. त्यामध्ये प्रापंचिक साहित्याबरोबरच घरांचेही नुकसान झालेले होते. नुकसानीबाबत विस्तृत अहवाल पंचनामे करुन शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे. वाडीमध्ये अंदाजे ५६ कुटुंबे रहातात. या ५६ कुटुंबांना शासनातर्फे तातडीची मदत म्हणून बुधवार दि १७ जुलै २०२४ रोजी कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते प्रत्येकी तातडीची मदत म्हणून प्रापंचिक साहित्यासाठी २५ हजार रुपये आणि घर दुरुस्तीसाठी ४१ घरांना प्रत्येकी २५ हजार रुपये मदत धनादेशाव्दारे देण्यात आली. वाडीतील इतर सर्व नुकसानीबाबत पंचनामे करुन विस्तृत अहवाल तयार करण्यात आलेला आहे. हा अहवाल शासनास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सादर केलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here