कोल्हापूर जिल्ह्यातील ४ गावांतील यात्रास्थळांना ब वर्ग यात्रा स्थळ म्हणून मान्यता; कागल तालुक्यातील चिमगांव येथील चिमकाईदेवी मंदीराचा ब वर्ग यात्रा स्थळांमध्ये समावेश

0
60

प्रतिनिधी : अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर :जिल्ह्यातील ४ यात्रास्थळांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण यात्रास्थळं योजने अंतर्गत ब वर्ग यात्रा स्थळ म्हणून मान्यता देण्यात आली. कोल्हापूर जिल्हा नियोजन समितच्या बैठकीत हा निर्णय झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांनी सादर केलेल्या जिल्ह्यातील भाविक भेट देत असलेल्या यात्रा स्थळांना “ब” वर्ग यात्रास्थळ म्हणून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव गावातील चिमकाई देवी मंदिर व मौजे कावणे ता करवीर येथील ज्योतिर्लिंग देवालय, विठ्ठल मंदिर तर, कागल तालुक्यातील मौजे वडगांव ता कागल गावातील भैरवनाथ मंदिर, भुदरगड तालुक्यातील देऊळवाडी गावातील केदारलिग मंदिर मंदिराचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here