कागल मधील प्रभाग क्र. 05 मधील 253 बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप..

0
56

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर /कागल :महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसनसो मुश्रीफ साहेब यांच्या विशेष प्रयत्नामुळे कागल येथील प्रभाग क्रमांक 05 मधील 253 बांधकाम कामगारांना महाराष्ट्र बांधकाम कामगार कल्याण मंडळा मार्फत सर्व नोंदणीत बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याचे चेअरमन व गोकुळ दूध संघाचे संचालक नविद मुश्रीफ साहेब यांच्या शुभहस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने उपस्थित होते.**प्रभाग क्रमांक 05 मधील वड्डवाडी, झोपडपट्टी, अनंत रोटो व अखिलेश पार्क या प्रभागातील 253 बांधकाम कामगारांना संसार उपयोगी साहित्य वाटप करण्यात आले.**तसेच यावेळी रमाई आवास योजनेअंतर्गत अलका शिवाजी कुरणे यांना तीन लाख रुपयाचे मंजुरी पत्र देण्यात आले व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या 190 महिलांची नोंदणी करण्यात आली.

यावेळी या प्रभागाचे नगरसेवक सतीश घाडगे, नवल बोते, पंकज खलिफ, भरत सोनटक्के, चंद्रकांत कांबळे, मारुती कुराडे, सागर कोकाटे, दिनेश कदम व प्रभागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here