सांगली: चांदोली धरणातून विसर्ग सुरू असतानाच ; आज पहाटे धरण परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के..

0
43

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

सांगली :सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात पावसाचा जोर कायम असून चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात सलग तिसऱ्या दिवशी अतिवृष्टी नोंदवली गेली. धरणातून विसर्ग सुरू असतानाच चांदोली धरण परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंपाची तीव्रता ३ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आली आहे. धरण परिसराला धोका नसल्याची माहिती आहे.शिराळा तालुक्यातील वारणावती परिसरात सुमारे आठ किलोमीटर परिसरात भूकंपाचे हादरे जाणवल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे. विशेष म्हणजे चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु असतानाच भूकंप झाला. सांगली जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. त्यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.दरम्यान गेल्या काही तासांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. हे धरण ८२ टक्के भरले असून पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. मात्र, त्याचवेळी भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here