मनोज जरांगे – पाटील उद्या शुक्रवारी ०९ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये येत आहेत.* जरांगे – पाटील यांची सध्या महाराष्ट्रभरात शांतता रॅली सुरू आहे. त्याअंतर्गत ते शुक्रवारी सांगलीतून कोल्हापूरात येत आहेत. कोल्हापूरमध्ये सकाळी ११.०० वाजता मिरजकर तिकटी येथे येतील. तेथे मराठा समाजातर्फे त्यांचे स्वागत होईल. त्यानंतर क्रांतीमनोज जरांगे – पाटील उद्या शुक्रवारी ०९ ऑगस्टला कोल्हापूरमध्ये दिनानिमित्त ऐतिहासिक स्तंभास अभिवादन करतील. तेथून पदयात्रा चालू होईल. फक्त जरांगे – पाटील हेच वाहनात असतील, उर्वरित सर्व जण पायी सहभागी होतील. छत्रपती शिवाजी महाराज चौकात दुपारी १.३० वाजता त्यांची जाहीर सभा होईल. सभेवेळी व्यासपीठावर जरांगे – पाटील यांच्याशिवाय अन्य कोणी नसेल, जिजाऊ वंदनेने सभेला सुरुवात होईल. सर्व मराठा नेत्यांसाठी व्यासपीठापुढे व्यवस्था केली जाईल. रात्री जरांगे – पाटील यांचा कोल्हापूरमध्ये मुक्काम असेल. रॅली व जाहीर सभेच्या निमित्ताने जिल्हाभरातून सकल मराठा समाज कोल्हापूर शहरात एकवटणार आहे. त्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. गावोगावी मराठा समाज मोठ्या संख्येने येणार आहे. पार्कींग आणि पिण्याच्या पाण्याची सोय जागोजागी करण्यात आली आहे. दरम्यान, मनोज जरांगे – पाटील कोल्हापूरमध्ये आल्यानंतर नियोजित केलेल्या अधिकृत आय कार्ड असलेले तरुण मानवी साखळी आणि दोरी घेऊन संरक्षण देणार आहेत. वैद्यकीय सेवा देण्यासाठी देखील शेवटी रुग्णवाहिका असेल. वैद्यकीय सेवा देणाऱ्या लोकांना अधिकृत आय कार्ड असेल. रॅलीमध्ये सामील होणाऱ्या लोकांनी कोठेही कचरा करू नये. शहरात जिल्ह्यातील प्रत्येक गावाहून लोक येणार असल्यामुळे शहरावर ताण वाढणार आहे. रॅलीमध्ये स्वच्छ्ता राखावी व स्वयंशिस्तीने रॅली पूर्ण करावी. पोलिसांना, आरोग्य सेवकांना व इतर सरकारी कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे.