प्रतिनिधी : संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाला लागलेल्या आगीत नाट्यगृह जळून खाक झाल. या नाट्यगृहात प्रसिद्ध गायक हरिहरन यांचा कार्यक्रम होणार होता. तोच कार्यक्रम रसिक निराश होऊ नयेत म्हणून सायबर ट्रस्टने तयार केलेल्या सभागृहात होणार आहे. सामाजिक बांधिलकी राखत हे सभागृह आयोजकांना या कार्यक्रमापुरत वापरण्यास देण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांच्या आणि ट्रस्टच्या वतीन देण्यात आलीये.
छत्रपती शाहूंच्या प्रेरणेने आणि त्यांच्या नावाने छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट म्हणजे सायबरची स्थापना झाली. संस्थापक डॉक्टर ए डी शिंदे आणि त्यांचे कुटुंबीय सामाजिक भान आणि जबाबदारी राखण्यामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेत .कोरोना काळामध्येही संस्थेने मुलांचे वस्तीगृह रुग्णांना वापरण्यासाठी दिलं होतं. आजही कोल्हापूरची शान आणि मान राखण्यासाठी तसेच संगीत सूर्य केशवराव भोसले आणि त्यांचे सांस्कृतिक कार्य आणि परंपरा याविषयी कृतज्ञता म्हणून उद्या दिनांक 13 रोजी सायंकाळी साडेसात वाजता संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात होणारा पूर्वनियोजित कार्यक्रम छत्रपती शाहू इन्स्टिट्यूट म्हणजेच सायबर इन्स्टिट्यूटच्या ‘आनंद भवन ‘ या 800 ते850 प्रेक्षकांची मर्यादा असणाऱ्या सभागृहात आयोजित करण्यात आलाय. हे सभागृह फक्त शैक्षणिक उपक्रमांकरीता उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात आले आहे. हरिहरन यांचा कार्यक्रम केशवराव भोसले नाट्यगृह इथ पूर्वनियोजित असल्यान आणि रसिकांची निराशा होऊ नये म्हणून या ठिकाणी आयोजित केल्याचं आयोजकांच्या वतीने आणि ट्रस्टच्या वतीने सांगण्यात आलय.
यावेळी या पत्रकार परिषदेस प्राध्यापक डी एस माळी, एस पी रथ, गिरीश महाजन, आनंद कुलकर्णी, प्राध्यापक राजेंद्र पारिजात, डॉक्टर विनय साळोखे उपस्थित होते.