
कोल्हापूर प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर/ फुलेवाडी : अल्पावधीत सुप्रसिद्ध झालेले होमिओपॅथिक क्लिनिक म्हणजे डॉ.मोनालीज होमिओपॅथिक क्लिनिक या होमिओपॅथिक क्लिनिकला अवघे एक वर्ष पूर्ण झाले.
डॉ. मोनाली सुभेदार यांनी बी एच एम एस (मुंबई) होमिओपॅथिक तज्ञ म्हणून पदवी संपादन करून एक वर्षापूर्वी डॉ. मोनालीज होमिओपॅथिक क्लिनिकची स्थापना 13 ऑगस्ट 2023 रोजी केली.आणि लोकांना होमिओपॅथिक संदर्भातील आरोग्यदायी सल्ला मार्गदर्शन व औषध उपचार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या करत आहेत.



सर्व आरोग्याच्या तक्रारीवर परिपूर्ण उपचार हा डॉक्टर मोनाली सुभेदार या होमिओपॅथिक औषध देऊन उपचार करत असतात. लोकांना होमिओपॅथिक बद्दल महत्व व मार्गदर्शन करत असतात. त्यांनी खूप कमी कालावधीमध्ये मापक फी मध्ये लोकांच्या आजारावर होमिओपॅथिक औषध व सल्ला खूप चांगल्या पद्धतीने देत आहेत. यामुळे अनेक लोक क्लिनिक मध्ये औषध उपचारासाठी येत असतात. डॉक्टर मनाली सुभेदार यांनी होमिओपॅथिक या क्षेत्रामध्ये आपला एक वेगळाच ठसा उमटवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी अनेक लोकांना आजारापासून होमिओपॅथिक औषध द्वारे बरे करण्यात यश संपादन केले आहे . विशेष म्हणजे या त्यांच्या कामाची दखल घेऊन राज्यस्तरीय महाराष्ट्र भूषण आदर्श होमिओपॅथिक डॉक्टर म्हणून SP-9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल च्या वतीने दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार आहे. नुकताच त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या क्लिनिकला एक वर्ष पूर्ण झाले याबद्दल क्लिनिक स्टाफच्या उपस्थितीमध्ये केक कापून सेलिब्रेशन करण्यात आले. यावेळी डॉक्टर मोनाली सुभेदार यांना शुभेच्छा देण्यात आल्या.