हिंदू धर्माबद्दल अपशब्द मराठा महासंघ कधीही खपवून घेणार नाही!- वसंतराव मुळीक यांचा अपमान म्हणजे समाजाचा अपमान- यापुढे टीका केली तर खपवून घेणार नाही

0
48

प्रतिनिधी :आखिल भारतीय मराठा महासंघ हिंदू धर्म आणि महापुरुष यांचा अपमान कधीही खपवून घेणार नाही. मराठा महासंघाने नेहमी विविध जाती धर्म आणि त्यांच्या महापुरुषांचा आदरच केला आहे. नेहमी सामाजिक सलोखा रहावा, कोणत्याही परिस्थितीत कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात जातीय तणाव निर्माण होऊ नये म्हणून मोठ्या भावाची भूमिका घेतली आहे. यापुढेही तीच भूमिका घेऊन काम केले जाईल. शाहू सलोखा मंचचे निमंत्रक व मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी कोल्हापूर शहरात सामाजिक सलोखा व शांतता राहावी म्हणून नेहमीच पुढाकार घेतला. किंबहूना कधीही राजकारणच न करता १००% समाजकारण केले. त्यामुळेच कोल्हापुरात सर्व जाती-धर्माच्या लोकांना वसंतराव मुळीक नेहमीच आपले वाटतात. सर्वच राजकीय पक्षांना ते आपल्या बरोबर असावेत, असे वाटते. परंतू कधीही वसंतराव मुळीक यांनी मराठा महासंघ कोणत्याही राजकीय पक्ष संघटनेबरोबर उभा केला नाही. स्वतःच्या आयुष्याची चाळीस वर्षे मराठा समाजासाठी नि:स्वार्थीपणाने खर्ची घालून विद्यार्थी सह युवा उद्योजक व समाज उपयोगी व समाजाला दिशा देणारे असंख्य उपक्रम राबवून समाजबांधव एकत्र केले. त्यांनी तन, मन, धन खर्ची घातलेच. पण, त्यांच्याबरोबर त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. मेघा मुळीक यांनी देखील त्यांच्या बरोबरीने मराठा समाजच्या कार्यात भाग घेऊन नानांना साथ दिली. नानांचे सर्व कुटुंबच मराठा समाजाच्या सेवेत तह हयात कार्यरत आहे. परंतू कोल्हापुरातील काही राजकीय मंडळींना नानांचे हे समाजकार्य अचानकच स्वार्था पोटी खटकण्यास सुरुवात झाली आहे. ज्यांनी कधीही स्वतःच्या मराठा समाजाला आपलेसे मानले नाही. व समाजाच्या उन्नतीसाठी कोणताही व कसलाही प्रयत्न केला नाही व कधीही सामाजिक बांधिलकी जपली नाही. केवळ स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी नेहमी कोल्हापूर शहरात जातीय ताणतणाव कायम राहावा, यासाठी तरुणांची माथी भडकावून समाज बांधवांना देशोधडीला लावले. अशी मंडळी राजकीय मंचावरुन नानांवर टीका टिप्पणी करीत आहेत. समाजकारण करत असताना टीका होत असते. परंतू त्यामध्ये सुध्दा एक प्रकारचे प्रेम, आदर असावा. गेल्या आठवड्यात कोल्हापुरातील एका कॅबिनेट दर्जाच्या राजकीय नेत्यांनी नानांवर टीका केली. त्यामध्ये त्यांनी नांनाचा एकेरी भाषेत उल्लेख करत ‘अरे तुरे’ ची भाषा केली. कोणतेही वैयक्तिक हेवेदावे नसताना किंवा त्यांच्या कोणत्याही क्षेत्राशी नानांचा वैयक्तिक संबंध नसताना एकेरी भाषेत उल्लेख करत अपमान केला. अशा प्रकरचे त्यांनी केलेले वर्तन आणि वक्तव्य हे नानांच्या कार्याची धास्ती घेऊन केलेले असावे. सर्व समाजात त्यांना मिळत असलेल्या आदर व प्रेम यामुळे असावे, असे आम्ही समजतो. परंतू मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांच्यावर पातळी सोडून केलेली टीका मराठा समाज व आखिल भारतीय मराठा महासंघ कधीही सहन करणार नाही. अशा प्रकारे खालच्या पातळीवर जाऊन टीका करणाऱ्या लोकांना मराठा महासंघ योग्य वेळी त्यांची जागा दाखवेल. तसेच आदरणीय वसंतराव मुळीक ह्यांची समाजातील योग्यता कोल्हापूर शहरातील सर्वच जाती धर्माचे नागरिक लवकरच दाखवून देतील यात शंका नाही. यापुढेही अशा प्रकरची टीका होत राहिल्यास जशास तसे उत्तर देऊ.जिल्हा अध्यक्ष शशिकांत पाटील, उदय देसाई, शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, चंद्रकांत चव्हाण, इंद्रजित माने, विजय पाटील, अनिल पाटील, प्रतीक साळोखे, गुरुदास जाधव, अवधुत पाटील यांनी असे पत्रक जाहीर केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here