स्वयंभू तरुण मंडळ आळवे यांच्यावतीने मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शाल,श्रीफळ,मानाचा फेटा देऊन सन्मान…

0
365

प्रतिनिधी मेघा पाटील

पन्हाळा /आळवे : स्वयंभू तरुण मंडळ आळवे यांच्यावतीने मंडळाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा शाल श्रीफळ मानाचा फेटा देऊन सन्मान करण्यात आला. विविध क्षेत्रात कार्यरत व समाजामध्ये चांगले काम करणारे व आपली वेगळी ओळख निर्माण करणारे अशा व्यक्तींचा प्रत्येक वर्षी स्वयंभू तरुण मंडळ आळवे यांच्या वतीने सत्कार केला जातो. या सत्कारामुळे आणखीन जोमाने काम करण्यासाठी एक प्रेरणा व ऊर्जा मिळते.

आज मंडळातील 4 पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा सामाजिक कार्यकर्ते ज्येष्ठ शिक्षक माननीय पी. के. पाटील (अण्णा ) व शिक्षक माननीय संग्राम बंगे, शिवाजी सुतार व रंगराव चौगुले यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला.

स्वयंभू तरुण मंडळाचे संस्थापक अध्यक्ष पैलवान आदिनाथ बंगे (वस्ताद )यांच्या या संकल्पनेतून हा उपक्रम प्रत्येक वर्षी राबवला जातो. विविध क्षेत्रांमध्ये स्वतःचा ठसा उमटवण्याचे काम करणाऱ्या गावातील व स्वयंभू तरुण मंडळ मधील कार्यकर्त्यांचा सत्कार केला जातो. हा सत्कार मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती शुभम नामदेव चौगुले, सागर शिवाजी पाटील, गजानन गुरव, योगेश खामकर हे होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here