SP-9 प्रतिनिधी मेघा पाटील
लॉंग लाईफ मेडिकल स्टोअर यांचा एक सामाजिक उपक्रम…
कोल्हापूर/ फुलेवाडी : दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी लॉंग लाईफ मेडिकल स्टोअर फुलेवाडी आयोजित मोफत आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बीपी तपासणी, शुगर तपासणी आणि वजन तपासणी करण्यात आले. यावेळी लॉंग लाईफ मेडिकल स्टोअर च्या वतीने या मोफत आरोग्य शिबिरामध्ये शुगर चेक करण्याचे मशीन ना नफा ना तोटा खास नागरिकांसाठी ऑफर मध्ये मशीन वाटप करण्यात आले. सर्वसामान्य नागरिकांना बीपी शुगर तपासणीसाठी भरपूर पैसे द्यावे लागतात. याचा विचार करून घरच्या घरी आपली बीपी व शुगर तपासणी करता येते यासाठी बीपी तपासणीचे मशीन व शुगर तपासणीचे मशीन या मोफत आरोग्य शिबिरा वेळी कमी किमतीत ऑफर मध्ये मशीन वाटप करण्यात आले.
लॉंग लाईफ मेडिकल स्टोअर हे कोल्हापूरमध्ये असे आगळे वेगळे उपक्रम राबवत असतात याचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होत असतो. सामाजिक कार्यात लॉंग लाइफ स्टोअर ग्रुप नेहमीच अग्रेसर असतो. लॉंग लाइफ मेडिकल स्टोअरच्या शाखा कोल्हापूर मध्ये सहा ठिकाणी कार्यरत आहेत. यामध्ये फुलेवाडी रिंग रोड, नागाळा पार्क, जवाहर नगर, राजारामपुरी, मंगळवार पेठ आणि उजळाईवाडी येथे नागरिकांच्या सोयीसाठी हे लॉंग लाइफ मेडिकल स्टोअर 24 तास सेवा देत आहे.
हे मेडिकल 24 तास सेवा देत असल्यामुळे नागरिकांची सोय झाली आहे.या आरोग्य शिबिरा प्रसंगी प्रणिता माने, स्नेहल पवार, आनंदा आमते, प्रियांका मिसाळ, शशिकांत कोळी, कुणाल जाधव, सायली वाडेकर,सानिका कुंभार, सौद मुल्ला, सागर वायफळकर आणि नागरिक उपस्थित होते. या मोफत आरोग्य शिबिराला नागरिकांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.