SP-9 प्रतिनिधी : मेघा पाटील
कोल्हापूर प्रतिनिधी : झंकार इंटरटेनमेंट व मयुरी डान्स स्टुडिओ आयोजित रास गरबा दांडिया season – 5 महिलांकडून उत्कृष्ट प्रतिसाद मिळाला. दिनांक 5 ऑक्टोबर 2024 रोजी सायंकाळी सहा ते दहा रास गरबा दांडिया सीजन फाईव्ह हा कार्यक्रम खास महिलांसाठी अमृत हॉल फुलेवाडी येथे आयोजित केला होता.मयुरी सुतार व विशाल सुतार यांनी रास गरबा दांडिया या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची सुरुवात हे दिग्गज प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून झाली.
लाईट, डीजे साऊंड, फूड स्टॉल, लकी ड्रॉ, सेल्फी पॉईंट, व्हिडिओ स्क्रीन आणि बरंच काही असे नेटके नियोजन केले होते. विशाल सुतार व मयुरी सुतार हे प्रत्येक वर्षी महिलांसाठी रास गरबा दांडिया कार्यक्रमाचे नियोजन करत असतात. महिलांसाठी स्पॉट गेम, भरपूर सारे गिफ्ट हे देत असतात. झंकार इंटरटेनमेंट हे अखंड महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे. लाईव्ह शो गाणी व डान्स शो कार्यक्रम अखंड महाराष्ट्रभर इव्हेंट घेत असतात.
एंटरटेनमेंट बरोबर सामाजिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय काम आहे. तसेच खास महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देत असतात. या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक अमृत मल्टीपर्पज हॉल फुलेवाडी हे होते. या कार्यक्रमाचे मीडिया पार्टनर म्हणून SP-9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल यांनी काम पाहिले, गिफ्ट पार्टनर वेदांत क्रिएशन हे होतेत. या कार्यक्रमासाठी माजी नगरसेवक फुलेवाडी राहुल माने,पूजा पाटील, ऋग्वेदा माने,SP-9 मराठी माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील ओम वेसणेकर,हिरकांत पाटील,पूनम मोरे,सागर पाटील,संग्राम भालकर,सुभाष गुंडेशा,स्मिता जंगम,अंश पोळ,संध्या पाटील, प्रकाश सुतार, गुरुप्रसाद सुतार, मुकुंद सुतार सरिता सुतार आदी मान्यवर उपस्थित होते. रास गरबा दांडिया कार्यक्रमातील विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ट्रॉफी व गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले.
यामध्ये उत्कृष्ट पोशाख विजेत्या पूजा मडावी व साक्षी मगदूम ह्या होत्या. उत्कृष्ट ग्रुप विजेता दांडिया रॉकर्स ग्रुप आणि दुसरा ग्रुप चक्काचक दिवा यांनी हा बहुमान पटकावला. उत्कृष्ट जोडी विजेत्या रिया जाधव आणि सही साळुंखे त्याचबरोबर द्वितीय मेगा गोसावी आणि जेनिफर डिसोजा यांनी हा मान पटकावला. उत्कृष्ट गरबा नृत्य कुमुदिनी जाधव त्या विजेत्या ठरल्या. उत्कृष्ट अभिव्यक्ती म्हणून रोशनी फरास यांनी मान पटकावला. सर्वोत्कृष्ट मुलांचा नृत्य उत्कर्षा ही विजेते ठरली. उत्कृष्ट पोशाख विजेते अन्वी कदम ठरली . मिस गरबा क्वीन विजेती सिद्धी आगळे हिने बहुमान पटकावला. मिस गरबा क्वीन रनर्रप ॲस्टर डिसूजा विजेती ठरली. त्याचबरोबर श्रीमती गरबा क्वीन विजेती पूनम वेसानेकर ही ठरली आणि श्रीमती गरबा क्वीन उपविजेती राजश्री गवळी हिने मान पटकावला. या कार्यक्रमा वेळी महिलांचे अलोट गर्दी होती. या गरबा दांडिया कार्यक्रमासाठी महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महिलांनी मनमुराद आनंद घेतला.