प्रतिनिधी मेघा पाटील
हडपसर /पुणे: दिनांक 9 /10/ 2024 रोजी सायंकाळी 6 ते 10 या वेळेत फ्युचर मित्र मंडळ अमनोरा पार्क टाउन हडपसर रास गरबा दांडिया आयोजित करण्यात आला होता. हा दांडिया चा कार्यक्रम तीन दिवसीय आहे. रोज संध्याकाळी सहा ते दहा या वेळेत आयोजित करण्यात आला आहे. यामध्ये भरपूर सारे पारितोषिक देण्यात येणार आहेत.
बेस्ट कपल,बेस्ट ग्रुप बेस्ट रेफ्री असे कॅटेगिरी वाइज यांना पारितोषिक देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे नेटके नियोजन फ्युचर मित्र मंडळ अमनोरा पार्क यांनी केले आहे. कार्यक्रमाच्या ठिकाणी फूड स्टॉल उपलब्ध करून देण्यात आले आहेत.लहान मुलं मुलींच्या पासून ते वयस्कर व जेष्ठ महिला पुरुषांनी या कार्यक्रमाचा मनापासून आनंद घेतला. कला सादर करण्यास वयाची बांधिलकी नसते. कलेला वय नसते हे ज्येष्ठ महिला व पुरुष यांनी या दांडीया च्या वेळी दाखवून दिले. लहान मुलांच्या पासून जेष्ठांपर्यंत डीजे साऊंड च्या तालावर ठेका धरत नाचण्याचा मनमुराद आनंद घेतला. या दांडियाच्या कार्यक्रमाला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
या कार्यक्रमा वेळी विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थिती मध्ये गिफ्ट देऊन सन्मानित करण्यात आले. प्रत्येक वर्षी फ्युचर मित्र मंडळ अमनोरा पार्क हे दांडियाचे नेटके नियोजन करत असतात.महिला व पुरुषांसाठी सदैव प्लॅटफॉर्म देण्याचा प्रयत्न फ्युचर मित्र मंडळ अमनोरा पार्क हे करत असतात. असे वर्षभर अनेक विविध उपक्रम सामाजिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम राबवत असतात.
या कार्यक्रमासाठी मीडिया पार्टनर म्हणून SP-9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल यांनी काम पाहिले. यावेळी फ्युचर मित्र मंडळ अमनोरा पार्क यांच्यावतीने पुणे ऑफिसचे डायरेक्टर पराग जुळेकर त्याचबरोबर पुणे हेड ऑफिस चे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांचा शाल टोपी देऊ सत्कार करण्यात आला .
या फ्युचर मित्र मंडळ अमनोरा पार्क टाउन हडपसर पुणे यांच्या कोर कमिटी मधील अध्यक्ष परमेश्वर पाटील, उपाध्यक्ष महेश देशमुख, सचिव दीपक गुप्ता, सहसचिव दर्शक सोळंकी, खजिनदार प्रमोद डोकानिया, सदस्य सत्यन दलाल, सदस्य दत्तात्रेय घुले, सदस्य फहीम खान, सदस्य ज्योत्स्ना उके, सदस्य आरती शेलार, त्याचबरोबर मंडळाचे कार्यकर्ते दिनेश शेंडे, नंदकुमार ठोंबरे, संदीप बोमीसेटी, अतुल स्वामी, शामल देशमुख,मंजू खान,नूतन चौधरी , क्षमा दलाल त्याचबरोबर सामाजिक कार्यकर्ते हरेश भाई सोळंकी आणि महिला व नागरिक उपस्थित होते.