कोल्हापूर प्रतिनिधी : प्रियांका शिर्के पाटील
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची नीती आयोगचे सीईओ बीव्हीआर सुब्रमणियम यांच्यासमवेत मंत्रालयात आज बैठक पार पडली.
यावेळी विविध विभागांचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत या बैठकीची माहिती दिली.
मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर क्षमता असून महानगर प्रदेशात केवळ पायाभूत सुविधांचा विकास न करता आर्थिक विकास व्हावा आणि या भागाचा जीडीपी ३०० दशलक्ष डॉलर्सपर्यंत नेण्यासाठी नीती आयोग समवेत आज बैठक झाली.
राज्य शासन यामध्ये नीती आयोगाशी संपूर्ण समन्वय ठेवेल, वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक स्वतंत्र टीम यासाठी नेमण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी यावेळी सांगितले.