18 नोव्हेंबरच्या सायंकाळी 6 पासून निवडणूक प्रचारास बंदी..

0
44

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर : दि. 15 :भारत निवडणूक आयोगाकडून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर झाला असून, त्यासाठी कोल्हापूर जिल्हयातील 10 विधानसभा मतदार संघासाठी बुधवार दिनांक २० नोव्हेंबर 2024 रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. मतदानापूर्वी ४८ तास अगोदर म्हणजेच दिनांक 18 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी 6 वाजल्यानंतर निवडणूकीचा प्रचार करता येणार नाही अगर सभा घेता येणार नाही. तसेच मतदानादिवशी दिनांक २० नोव्हेंबर रोजी मतदान संपेपर्यंत बेकायदेशीर जमाव जमवणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे, पाच किंवा पाचपेक्षा अधिक लोक एकत्र येणे अशी कृत्ये करण्यास प्रतिबंध करण्यात आल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी जारी केले आहेत.* या आदेशानुसार बेकायदेशीर जमाव जमविणे आणि सार्वजनिक सभा, बैठका घेणे अगर निवडणूक प्रचार करणे, पाच किंचा पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येणे. (पूर्व नियोजित सामाजिक व धार्मिक कार्यक्रम वगळून व भारत निवडणूक आयोगाने प्राधिकृत केलेले अधिकारी व निवडणूक कामाशी निगडित कर्मचारी वगळून.) तथापी वरील आदेश मतदाना करीता घरोघरी जावून भेटी देण्यासाठी लागू राहणार नाही. या आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास, ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ प्रमाणे शिक्षेस पात्र राहील. असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here