प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळालं आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपच्या १३२ जागा, शिवसेनेच्या ५७ जागा तर राष्ट्रवादीच्या ४१ जागा निवडून आल्या आहेत. त्यामुळं राज्यात महायुतीचीच पुन्हा सत्ता येणार आहे.
राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर सध्या चर्चा सुरु झाली आहे ती मुख्यमंत्रीपदाची. राज्याचा नवा मुख्यमंत्री कोण होणार? याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे. तर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या बाबतीत सर्वात प्रबळ दावेदार आहेत. दुसरीकडे संभाव्य मंत्र्यांची नावं समोर आली आहेत.पहिल्या टप्प्यात शिवसेनेचे ५ मंत्री शपथ घेणार आहेत आणि राष्ट्रवादीचे ही पाच मंत्री शपथ घेणार आहेत. तर भाजपचे १० मंत्री शपथ घेणार असून संभाव्य मंत्र्यांची यादी समोर आली आहे.पहिल्या टप्प्यात एकूण २० मंत्री शपथ घेणार आहेत. शिवसेनेकडून एकनाथ शिंदे, उदय सामंत, तानाजी सावंत, दीपक केसरकर, शंभुराज देसाई हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं कळतं आहे. तर राष्ट्रवादीकडून अजित पवार, अदिती तटकरे, अनिल पाटील, धनंजय मुंडे आणि दिलीप वळसे पाटील शपथ घेणार आहेत. मात्र मुख्यमंत्री कोण होणार याचा सस्पेंस अजूनही कायम आहे.
उद्या नवीन सरकारचा शपथविधी होणार आहे. आज रात्री महायुतीतील तिन्ही पक्षाचे मोठे नेते दिल्लीत येऊ शकतात. उद्या २६ नोव्हेंबर रोजी शपथविधीवर यासंदर्भात महत्त्वाचा निर्णय होऊ शकतो, असं कळतंय.