प्रतिनिधी :मेघा पाटील
कोल्हापूर- कोरोनाच्या कालावधीत मराठी चित्रपट निर्माते अनुदानास अपात्र ठरल्याने त्यांना दहा लाखां ऐवजी वीस लाख रुपये तात्काळ देण्याची मागणी अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्मात्याचे अध्यक्ष यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.त्याच प्रमाणे सध्या मराठी चित्रपटाचे नाव असलेले बदलून ते मराठी चित्रपट प्रोत्साहन योजना करण्याची मागणी केली.तसेच जीएसटी बंद न करता निर्मात्याना अनुदान स्वरुपात मिळावी.,चित्रपटाचा दर्जा पाहून तीन महिन्यात निर्मात्यांच्या खात्यात 25 लाख रुपये अनुदान जमा करावे .अशा विविध मागण्या केल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली.
या वेळी अध्यक्ष देवेंद्र मोरे ,उपाध्यक्ष विजय शिंदे,कार्याध्यक्ष बाळासाहेब गोरे ,संजय दिक्षीत,डॉ.आबनावे,जिद्द फौंडेशनच्या गितांजली डोंबे ,संगीता कांबळे,कोटकर आणि अशोक सुर्यवंशी उपस्थित होते.