
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर :- स्केटिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्र यांच्या वतीने नुकत्याच मुंबई व पुणे येथे घेण्यात आलेल्या स्केटिंग स्पर्धेत विचार कोल्हापूर जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनच्या विविध स्केटिंग संघांचा सहभाग होता. यामध्ये कोल्हापूर जिल्हा संघातील आठ स्केटिंग खेळाडूंची मैसूर ,बेंगलोर व तामिळनाडू येथे होणाऱ्या ६३ व्या स्केटिंग फेडरेशन राष्ट्रीय अजिंक्यपद स्केटिंग स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघात निवड करण्यात आली आहे. गेली नऊ वर्ष राष्ट्रीय स्पर्धेसाठी जिल्हा संघटनेच्या खेळाडूंची निवड होत आहे. निवड झालेले स्केटिंग खेळाडू खालील प्रमाणे.
(स्पेशलस्पीड विभाग राज्य संघ)
१)ओम मेघशाम जगताप.
( रोलर डर्बी राज्य संघ.) २)तेजस्विनी रामचंद्र कदम ३)धनश्री रामचंद्र कदम.
४) वीरश्री महेश कदम.
(रोलर हॉकी राज्य संघ)
५) सुजल सुधीर पाटील
६)यश भिकू कांबळे.७) मयूर कुराडे.
८) साकेत अरुण आपके. या राष्ट्रीय स्पर्धा वरील ठिकाणी ५ डिसेंबर ते १६.डिसेंबर २०२४ या कालावधीत होणार आहेत.या सर्वांना प्राचार्य.अभयकुमारजी साळुंखे,जिल्हा संघटनेचे अध्यक्ष अनिल कदम, ॲड.धनंजय पठाडे, प्रा.आखाराम पाटील, प्रा.अजित मोहिते, प्रा. संभाजी पाटील, जगदीश दळवी, संजय फराकटे. यांचे मार्गदर्शन तर आंतरराष्ट्रीय स्केटिंग प्रशिक्षक. डॉ.महेश अभिमन्यू कदम. व राष्ट्रीय कोच भास्कर कदम यांचे मार्गदर्शन लाभले.