न्यू मॉडेलच्या गौरी चव्हाण व राजवर्धन जगदाळे यांची राज्य शालेय शूटिंग स्पर्धेसाठी निवड.

0
61

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर :- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे व संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ५ ते ७ डिसेंबर २०२४ या कालावधीत संभाजीनगर येथे होणाऱ्या राज्य शालेय शूटिंग स्पर्धेसाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचे विद्यार्थी कुमारी गौरी चव्हाण व राजवर्धन जगदाळे यांची१९ वर्षातील गटामध्ये राज्यशालेय शूटिंग स्पर्धेसाठी निवड झाली आहे .राजवर्धन हा १० मीटर एअर रायफल प्रकारात व गौरी ही १० मीटर पिस्टल प्रकारात विभागीय स्पर्धेत विजेते आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळे त्यांची राज्य स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. या दोघांना विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य.अभयकुमार साळुंखे. सचिवा, प्राचार्या .सौ .शुभांगी मुरलीधर गावडे. संस्थेचे सी.ई.ओ. श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे. यांचे मार्गदर्शन आणि कॉलेजचे सर्व शिक्षक- शिक्षकेतर प्राध्यापक- प्राध्यापिका वर्ग यांचे आणि जिमखाना विभाग प्रमुख डॉ. महेश अभिमन्यू कदम. यांचे सहकार्य लाभत आहे.################## माननीय, संपादकसो, दैनिक. ———-वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकामध्ये प्रसिद्ध करून आम्हास सहकार्य करावे. आपले. डॉ.महेश अभिमन्यू कदम. जिमखाना विभाग प्रमुख न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here