
प्रतिनिधी प्रदीप अवघडे
कोल्हापूर:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र शासन पुणे व धुळे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने दिनांक २८ ते ३० नोव्हेंबर २०२४ या कालावधीमध्ये धुळे या ठिकाणी घेण्यात आलेल्या राज्य शालेय कराटे स्पर्धेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजचा विद्यार्थी कु.तौहीद हमीद नायकवडी. यांनी १९ वर्षा आतील मुले या गटामध्ये कराटे स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्याचे संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य.अभयकुमार साळुंखे.यांनी व संस्थेच्या सचिवा प्राचार्या.सौ. शुभांगी मुरलीधर गावडे. संस्थेचे सी.ई.ओ. श्री. कौस्तुभ मुरलीधर गावडे.यांनी अभिनंदन केले. तौहीद ला कॉलेजचे प्राध्यापक- प्राध्यापिका आणि शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य तर जिमखाना विभाग प्रमुख डॉ. महेश अभिमन्यू कदम. यांचे मार्गदर्शन लाभले.”””””””””””””””””””””””””””””””””””””””माननीय, संपादक सो ,वरील वृत्त आपल्या लोकप्रिय दैनिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती.आपले, डॉ. महेश अभिमन्यू कदम .जिमखाना विभाग प्रमुख न्यू मॉडेल ज्युनिअर कॉलेज कोल्हापूर.