आमदार चंद्रदीप नरके ॲक्शन मोडवर; माजी सरपंचा विरोधात ठोकला अब्रुनुकसानीचा दावा

0
258
  • ! प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत महायुतीने बाजी मारली. मतमोजणीच्या दिवशी एकतर्फी निकाल लागेल, अशी आशा लागून राहिलेल्या करवीर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना शिंदे गटांचे उमेदवार चंद्रदीप नरके यांना शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांनी चांगलाच घाम फोडला होता. अखेर चंद्रदीप नरके हे कमी मताधिक्याने विजयी झाले. दरम्यान आमदारकीचा गुलाल लागताच नरके हे चांगलेच ॲक्शन मोडवर आले आहेत. निवडणुकीच्या वेळी प्रचारादरम्यान खोटा प्रचार करणाऱ्या विरोधात थेट अब्रू नुकसानीचाच दावा दाखल केला आहे. वडणगेच्या माजी सरपंच विरोधात त्यांनी एक कोटीचा दावा दाखल केला आहे. सध्या त्याची चर्चा जिल्ह्याभर सुरू आहे.करवीर विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या प्रचार शुभारंभ हा वडणगे गावात झाला. या शुभारंभ प्रसंगी बोलताना गावचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी आमदार चंद्रदीप नरके यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता.
    गावात असणाऱ्या शिवपार्वती तलावाच्या कामासंदर्भात एक कोटीचा ढपला पाडला असल्याचा आरोप केला होता. नव्याने मंजूर केलेल्या पंधरा कोटीच्या कामातही मोठा ढपला पडला जाणार असल्याचा आरोप सचिन चौगुले यांनी केला होता. हा आरोप आमदार चंद्रदीप नरके यांच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.आमदार नरके यांच्याकडून हा आरोप तथ्यहीन असल्याचे सांगत थेट वकिलामार्फत माजी उपसरपंच सचिन चौगुले यांना नोटीस बजावली आहे. नुकसानीचा दावा केला असून हा आरोप चुकीचा आहे. आरोप मागे घेऊन त्यांनी दोन दिवसात जाहीर माफी मागावी अन्यथा न्यायालयात एक कोटीचा भरून नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा नोटीसमधून दिला आहे.
    वडनगेचे माजी सरपंच सचिन चौगुले यांनी आपण कोणाचेच नाव यादरम्यान केलेल्या भाषणात घेतले नाही, त्यामुळे माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही असे उत्तर दिले आहे. शिवाय नरके यांच्या नोटीसीला आपण कोर्टातच उत्तर देऊ, असेही सचिन चौगुले यांनी म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here