सख्ख्या बहिण-भावाचा केकमधून विषबाधा होऊन मृत्यू; कागल तालुक्यातील चिमगाव येथील घटना

0
728

प्रतिनिधी :प्रदिप अवघडे कागल :कागल तालुक्यातील चिमगाव येथील आंगज कुंटूबीयातील दोन सख्ख्या बहिण-भावांचा केकमधून विषबाधा होऊन मृत्यू झाला. तर त्यांच्या आईलाही विषबाधा झाल्याची घटना आज सकाळी मंगळवार ३ डिसेंबर २०२४ रोजी घडली. या घटनेने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला असून चिमगाव गावावर शोककळा पसरली आहे.कागल तालुक्यातील चिमगाव येथील आंगज कुटुंबियांनी एकत्रित केक खाल्यनंतर सकाळच्या सुमारास श्रयेश रणजित आंगज (वय ४), काव्या रणजीत आंगज (वय 6) व मुलाच्या आईला उलट्या, जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने या तिघांना उपचारासाठी मुरगूड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मृत्यू झाला श्रयेश काव्या अशी मृत्यू झालेल्या बहिण-भावंडाची नावे आहेत.तर काव्याची प्रकृती ठिक असल्याने तिला ग्रामीण रुग्णालय मुरगूड दाखल करण्यात आले होते अचानक दुपारच्या सुमारास अचानक काव्याची प्रकृती बिघडल्यामुळे तिला कोल्हापूर प्रमिलाराजे रुग्णालय सिपीआर येथे दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान काव्याचा मृत्यू झाला. नेमकी विषबाधा कशामुळे झाली याचा शोध पोलिस घेत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here