देवाघरची फुलं देवाघरी गेली, पेस्टीं केक खाल्यामुळे विषबाधा होऊन, सख्ख्या भावंडांचा करुण अंत..

0
300

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा मुरगुड : सख्ख्या भावंडांचा मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज कागल तालुक्यातील चिमगांव मध्ये समोर घडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगांव येथे हा प्रकार घडला. श्री रणजित नेताजी आंगज यांचा मुलगा श्रेयस वय वर्षे ४आणि मुलगी काव्या वय वर्षे ७ अशा दोघा सख्ख्या बहीण-भावाचा पेस्टी केक खाल्यावर जूलाब उलट्या झाल्या त्यांतच उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला आहे. या घटनेमुळे अख्ख्या गावावर शोककळा पसरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here