प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
आज बुधवार दि ५ डिसेंबर रोजी सकाळी महाराष्ट्र, छत्तीसगड, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशच्या अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर ऑफ सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.३ एवढी होती. सकाळी ७.२७ वाजता भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून ४० किलोमीटर खाली होता.
हा भूकंप १५ते २० सेकंद राहिला. प्राथमिक माहितीनुसार या भूकंपात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली आणि छत्तीसगडमधील विजापूर, सुकमा आणि दंतेवाडा येथे भूकंपाचे धक्के जाणवले.
याशिवाय तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील मुलुग, हैदराबाद, रंगारेड्डी, भद्राद्री कोठागुडेम, खम्मम आणि कृष्णा जिल्ह्यातही लोकांना भूकंपाचे धक्के जाणवले.
भूकंपामुळे घरांच्या भिंतींना भेगा पडल्या. लोकांनी घराबाहेर पडून मोकळ्या मैदानात जाऊन स्वतःचे संरक्षण केले.
Home Uncategorized महाराष्ट्रासह ४ राज्यांमध्ये भूकंपाचे धक्के:तीव्रता ५.३ रिश्टर स्केलवर ; केंद्र जमिनीपासून ४०...