फोंडाघाटात पेट्रोलच्या टँकरला भीषण आग ; एकाचा होरपळून मृत्यू, घाटामधील वाहतूक ठप्प

0
97

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर हून कोकणाला जोडणाऱ्या फोंडा घाटात एका पेट्रोल टॅंकरला आग लागली त्यामुळे एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवार दि ४ डिसेंबर रोजी सायंकाळी ६.३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. टॅंकरला लागलेली आग विझवण्यासाठी अग्रिशामक दलाला पाचारण करण्यात आले असून त्यांनी आग आटोक्यात आणली आहे. या दुर्घटनेमुळे फोंडा घाटातील वाहतूक पूर्णत: ठप्प झाली आहे.निपाणी देवगड या महामार्गावर फोंडा घाटात भारत पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल टँकर बुधवारी बुधवारी सायंकाळी पलटी झाल्याने मोठा अपघात झाला. हा अपघात सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास घडला. अपघात होताच पेट्रोल टँकरने लगेचच पेट घेतला. या अपघातात एकाचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्यामुळे फोंडाघाट मधील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली आहे. सिंधुदूर्गात पेट्रोल घेऊन येत असताना पेट्रोल टँकर चालकाचा ताबा सुटल्याने फोंडाघाट मधील वळणामध्ये पलटी होऊन अपघात झाला.अपघातानंतर लगेचच टँकरने पेट घेतल्यामुळे टॅंकरमधील एकजण जळालेल्या अवस्थेत बाहेर फेकला गेला आहे. या अज्ञात व्यक्तीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. त्याचा चेहरा संपूर्णपणे भाजला आहे. या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप उप पोलीस निरीक्षक राजकुमार मुंडे अनिल हाडळ यांच्यासह पोलिसांचे पथक फोंडाघाट येथे दाखल झाले आहे. तसेच आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशामक बंबाची मदत घेण्यात आली आहे.स्थानिकही मोठ्याप्रमाणात या ठिकाणी जमा झाले आहेत.दरम्यान, टँकरने पेट घेतल्यामुळे फोंडाघाट मार्ग बंद झाला असून कोल्हापूर व कोकणात जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या आहेत. कारण सध्या करुळघाट सध्या बंद असल्यामुळे मोठी वाहतूक या फोंडाघाट मार्गाने सुरू आहे. या अपघातामुळे पर्यटकांना आणि वाहन चालकांना या अपघाताचा फटका बसला आहे.वैभववाडी, कणकवलीतून पश्चिम महाराष्ट्रात जाण्याकरिता करुळघाट, फोंडा घाट असे पर्याय आहे. करुळघाटाचे नुतनीकरणाचे काम शासनातर्फे सुरु आले आहे. त्यामुळे अवजड आणि इतर सर्वच वाहने फोंडा घाटाचा वापर करत आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा आहे. मात्र आज झालेल्या या दुर्देवी अपघातामुळे येथील वाहन ठप्प झाले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here