शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना तृतीय स्मृतीदिनी अभिवादन..

0
60

प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर :शहराचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे, शहराच्या विकासाचा विचार करून पुढे जाणारे दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांना तृतीय स्मृतीदिनी अभिवादन करण्यात आले.
दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांचा आज तृतीय स्मृतिदिन… आपल्या लाडक्या नेत्याला कोल्हापूरवासियांनी अभिवादन केले… आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला… आण्णांच्या आठवणीने अनेक कार्यकर्ते गहिवरले… कुटुंबातील प्रत्येकाचे डोळे पाणावले… असा हा भावनिक कार्यक्रम जिव्हेश्वर हॉल, सम्राटनगर येथे आज झाला.

आमदार चंद्रकांत जाधव यांच्या जाण्याने कोल्हापूरचे एक यशस्वी उद्योजक, उत्कृष्ट फुटबॉलपटू, अभ्यासू राजकीय नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने कधीही भरून न येणारी पोकळी निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली.
कोल्हापूर शहराचे विकासाचे व्हिजन असलेले दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांची क्षणोक्षणी आठवण येत असल्याचे उद्योजक मित्रांनी सांगितले.
यावेळी विविध मान्यवरांनी आण्णांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या मा. आमदार जयश्री जाधव, युवा उद्योजक सत्यजित जाधव, प्रेमला जाधव, माजी नगरसेवक संभाजी जाधव, जयश्री चंद्रकांत (आण्णा) जाधव फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. दश्मिता सत्यजित जाधव यांच्यासह सर्व जाधव कुटुंबीयांनी आण्णांना अभिवादन केले.
भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव, राहुल चिकोडे, कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे, युवा नेते ऋतुराज क्षीरसागर, उदय दुधाने, दीपक चोरगे, संजयकाका जाधव, दुर्गेश लिंग्रस, अनुप पाटील, कमलाकर जगदाळे, अनिल घाडगे, काका पाटील, गायत्री राऊत, माजी नगरसेवक अशोक जाधव, अजिंक्य जाधव, अॅड. इंद्रजीत चव्हाण, धनंजय दुग्गे, संपत पाटील, अनिल धडाम, शिवराज जगदाळे, जयेश ओसवाल, सुनिल शेळके, मोहन कुशिरे यांच्यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, उद्योजक आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here