मेघा पाटील प्रतिनिधी
कोल्हापूर : सायबर ट्रस्ट संचालित,कॉलेज ऑफ नॉन कन्व्हेन्शनल व्होकेशनल कोर्सेस फॉर वुमेन(महिला महाविद्यालय) या महाविद्यालयातील कु. इशा संतोष चव्हाण बीएससी फूड टेक्नॉलॉजी भाग दोन ची विद्यार्थिनी दिनांक ७/१२/२०२४-११/१२/२०२४ या दरम्यान होणाऱ्या पश्चिम विभागीय अंतर विद्यापीठीय स्पर्धा वर्धमान विद्यापीठ. कोटा, राजस्थान २०२४-२०२५ येथे होणाऱ्या स्पर्धेमध्ये शिवाजी विद्यापीठच्या फुटबॉल महिला संघात निवड झाली आहे. या खेळाडूला महाविद्यालयातील शा.शिक्षण संचालक प्रा. रामेश्वरी गुंजीकर यांचे मार्गदर्शन लाभले. प्राचार्य डॉ. आर जे कुलकर्णी. आणि सायबर संस्थेचे सेक्रेटरी व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ.आर.ए.शिंदे यांनी तिचे अभिनंदन केले .