आज दिनांक 6 डिसेंबर 2024 रोजी मंगळवार पेठ येथे हॉकर्स जॉईन ॲक्शन कमिटी व श्रमिक सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरि निर्वाण दिनानिमित्त चे औचित्य साधून ऑफिसमध्ये विश्वकर्मा योजनेचे फॉर्म भरून घेण्यात आले व आयुष्यमान कार्ड आभा कार्ड इन श्रम कार्ड कार्ड काढून देण्यात आली तसेच महिलांना स्वतःच्या पायावर उभी करण्यासाठी ठुशीचे ट्रेनिंग देऊन पर्सचे ट्रेनिंग शिवणकामामध्ये देऊन घरी महिलांना रोजगार मिळण्यासाठी मदत करण्यात आली तसेच महिलांना पॅकिंगचेही काम देण्यात आले तसेच यातून महिलांना योजनेचा लाभही मिळवून देण्यात आला यासाठी अध्यक्षा सौ निर्मला प्रमोद कुराडे या त्यांच्या पाठीशी खंबीरपणे साथ देतात व महिलांना सबलीकरण करण्यासाठी मदत करतात आंबेडकर फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून महिलांनी चांगल्या प्रकारे सहकार्य केले याला उपस्थिती संघटनेचे पदाधिकारी होते व ऑनलाईन काम करण्यासाठी क्रांती मेढे व फॉर्म भरण्यासाठी शेलाजा पोतदार उपस्थित होत्या.