प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृह येथे दूधगंगा बचाव कृती समितीची बैठक पार पडली. या बैठकीला कोल्हापूर जिल्ह्यातील कागल, राधानगरी तालुक्यातील सर्वच नेत्यांनी सहभाग घेतला.
या बैठकीमध्ये ना. हसन मुश्रीफ यांनी सांगितले होते की, “आम्ही त्वरित या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्याशी चर्चा करू.
आणि या चर्चेतून आम्ही मुख्यमंत्र्यांना दूधगंगा नदीचे पाणी हे इचलकरंजीला देता येणार नाही या संदर्भात मुखमंत्र्यांना निवेदन सादर करू.”
याच निर्णयावरती खासदार संजय मंडलिक, वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य मंत्री हसन मुश्रीफ, कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे, भाजपचे राजे समरजित सिंह घाटगे, आ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन.
या संदर्भात मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले.