राज्यात कृत्रिम पाऊस पाडण्याच्या हालचालींना वेग, मंत्री गुलाबराव पाटलांची माहिती

0
85

प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा

पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे. राज्य सरकार कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न करत आहे. राज्यात यावर्षी आतापर्यंत सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांचा संपूर्ण खरीप हंगाम वाया जाण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरण असल्यास पाऊस पाडण्याच्या हालचालींना वेग आला आहे. शास्त्रज्ञांशी चर्चा देखील सुरु करण्यात आली आहे.

त्यानंतर राज्य सरकारकडून याबाबत महत्वाचा निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मंत्री गुलाबराव पाटलांनी दिली आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकरी अडचणी सापडला आहे.

पिकांचं फार मोठं नुकसान झालं आहे. दुष्काळसदृष परिस्थिती निर्माण झाली आहे. यापुढे पाणीटंचाईची फार मोठी समस्या उभी राहू शकते. आता कृत्रिम पाऊस पाडण्याची मागणी होऊ लागली आहे.

शास्त्रज्ञांशी याबाबत चर्चा सुरु आहे. पोषक वातावरण असेल तर कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.

दुष्काळी परिस्थिती उद्भवू नये याकरता राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. मंत्रालयातील वॅार रुममध्ये दुष्काळ नियंत्रण वॅार रुम तयार केलं जाणार आहे. सातव्या मजल्यावरील CM वॅार रुममधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे.

सरासरीपेक्षा कमी पाऊस
या भागांना दुष्काळी परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी विविध उपाययोजना सरकारकडून केल्या जाणार आहेत. राज्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस पडल्याने यंदा राज्यातील काही भागात दुष्काळी परिस्थिती उद्भवू शकते. यामुळे राज्य सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here