शिराळा / प्रतिनिधी: पेठच्या कराटे प्रशिक्षिका वर्षा पाटील यांना ईगल फौंडेशच्या वतीने संजय घोडावत युनिव्हर्सिटी अतिग्रे येथे राज्यस्तरीय क्रिडा शिक्षिका म्हणून हातकणंगले तालुक्याचे तहसीलदार सुशिल बेल्हेकर, पुण्याचे उपजिल्हाधिकारी डॉ. संजय कुंडेटकर, डी. वाय. पाटील शिक्षण समुहाचे विश्वस्त सुर्यकांत तोडकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी व्यासपीठावर माजी खासदार निवेदिता माने, सनदी लेखापाल डॉ. शंकर अंदानी, ईगल फौंडेशचे अध्यक्ष विलासराव कोळेकर , धनगर समाजाचे नेते प्रविण काकडे आदी मान्यवर उपस्थित होते. वर्षा पाटील यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पेठ येथे झाले आहे. के. बी. पी. महाविद्यालय इस्लामपूर येथे पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी कोल्हापूर येथील कराटे प्रशिक्षिक रमेश पिसाळ ,सुषमा पिसाळ यांच्या कडून कराटेचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. त्यानंतर त्यांनी शोतोकोन कराटे डो असोशिएशन कोल्हापूर या संस्थेच्या माध्यमातून इस्लामपूर, आष्टा परिसरातील नामांकित शाळांमध्ये अनेक विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षिण दिले. यामुळे अनेक मुला- मुलींनी कराटे स्पधेॅत प्रावीण्य मिळवले आहे. वर्षा पाटील ह्या सध्या शोतोकोन कराटे डो असोशिएशन कोल्हापूर संस्थेच्या सांगली जिल्हाअध्यक्ष म्हणून काम पहात आहेत. त्यांना मिळालेल्या राज्यस्तरीय आदर्श क्रिडा शिक्षिका पुरस्काराबद्दल परिसरातून त्यांचे विशेष अभिनंदन होत आहे. फोटो ओळी : उपजिल्हाधिकारी डॉ संजय कुंडेटकर, तहसीलदार सुशिल बेल्हेकर यांच्या हस्ते राज्यस्तरीय आदर्श क्रिडा शिक्षिका पुरस्कार स्वीकारताना वर्षा पाटील