प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर :करणी जादूटोणा प्रकरणातून ८४ लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी एका महिला पोलीस कॉन्स्टेबल अटक केली आहे. सिंधुदुर्ग पोलीस दलातील तृप्ती संजय मुळीक असे त्यांच नाव आहे.जुना राजवाडा पोलिसांनी काल बुधवारी ही कारवाई केली आहे.याप्रकरणी सुभाष हरी कुलकर्णी गंगावेश कोल्हापूर यांनी फिर्याद दिली आहे. तुमच्या घरातील व्यक्तीवर करणी केली आहे त्यामुळे तुमच्या मुलांची लग्न होत नाहीत. घरात कसलेही यश येत नाही. अशी भीती घालून काहीजणांनी कुलकर्णी यांच्याकडून तब्बल ८४ लाखांचे सोन्याचे दागिने आणि इतर साहित्य लुबाडले आहे. याप्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यानंतर एकूण नऊ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.या प्रकरणातील मुख्य संशयित दादा पाटील महाराज यांच्यासह इतर काहीजण अद्यापही फरार होणार आहेत.