
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर: मकर संक्रांत पर्वानिमित्त महिला वर्गासाठी हळदी कुंकू आणि लहान मुलांसाठी बोरन्हण उपक्रम हॉकर्स जॉईंट ॲक्शन कमिटी व श्रमिक सेवा संस्थेतर्फे शिंगोशी मार्केट येते उत्साहात पार पडला.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे मंडईमध्ये भाजी विक्री करणाऱ्या महिला व त्यांची छोटी मुले यांना बोरन्हान व हळदी कुंकवाचा कार्यक्रम करण्यात आला. संस्थेशी संबंधित महिला सभासद बचत गटातील महिला यांनी संक्रांत वाण एकमेकींना देऊन या कार्यक्रमाचा आनंद घेतला. मार्केट मधील सर्व फेरीवाल्यांना प्लास्टिक च्या कॅरीबॅग ला उत्तम पर्याय अशा कापडी पिशव्या संस्थेमार्फत वाटण्यात आल्या.

या कार्यक्रमाचे नियोजन हॉकर्स जयंती कमिटीच्या महाराष्ट्र सरचिटणीस निर्मला प्रमोद कुराडे यांनी केले. मार्केट मधील सर्व व्यवस्था शिंगोशी मार्केट कमिटीचे अध्यक्ष श्री अजिंक्य म्हस्कर यांनी केले.उपस्थित महिलांच्या छोट्या मुलांना क्षीरसागर वहिनी यांच्या हस्ते बोर नहान घालण्यात आले सुहासिनींना व पूर्णांगिनींना संक्रांत वाण देण्यात आले. महिलांनी उखाणे घेतले.. प्रथमच मार्केट मधील महिलांसाठी हॉकस जॉइंट एक्शन कमिटी व श्रमिक सेवा संस्था यांच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ वैशाली शिरसागर वहिनी उपस्थित होत्या. लाडकी बहीण योजनेच्या कोल्हापूर जिल्ह्याच्या अध्यक्ष सौ सिद्धी रांगणेकर याही उपस्थित होत्या तसेच संस्थेच्या सर्व सभासद महिला व बचत गटाच्या महिला यांनी ही उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. मार्केटमधील सर्व फूलवाले व भाजीवाल्या महिला यांनी सहभाग घेतला.
