संपादक जिल्हा रत्नागिरी / मेघा कोल्हटकर

जिल्हा रत्नागिरी : दिनांक २४,२५,२६ जानेवारी रोजी रत्नागिरी मधील माळनाका या भागांत असलेल्या जयेश मंगल पार्क येथे, ‘इनर व्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊन’ आयोजित फूड फेस्टीव्हल आणि शॉपिंग कार्निवल २०२५ चे संयोजन करण्यांत आले. वेगवेगळ्या वस्तूंचे स्टॉल्स लावण्यात आले होते. रत्नागिरीच्या बाहेरील विक्रेत्यांचा यांत सहभाग दिसून आला, त्यांच्याशी संवाद साधताच प्रतिसाद उत्तम असल्याची प्रतिक्रिया मिळाली.

संध्याकाळी नृत्य-गायन यांसाठी बालचमूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यांत आले. या कार्यक्रमांत कोल्हापूर मधील माध्यम समूह PREES SP-9 हे ‘निर्भया प्रेस वुमन असोसिएशन’चे काम कसे करते आणि ‘आरोग्य दिनदर्शिका’ ची माहिती कोकण वासियांपर्यंत मेघा कोल्हटकर यांनी पोहोचवली. क्लब च्या प्रेसिडेंट डॉ. स्वप्ना संदिप करे यांनी या कार्यक्रमांस भेट देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान केला, वैद्यकीय क्षेत्रांत कार्यरत असूनही डॉ. स्वप्ना यांचा सामाजिक कार्यातही सहभाग असतो.



