
प्रतिनिधी मेघा पाटील
गंगाई हॉल फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर येथे सामाजिक कार्यकर्ते विजय सिंह उर्फ रिंकू देसाई आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमास महिलांचा उत्स्फूर्त आणि उदंड प्रतिसाद…


फुलेवाडी /कोल्हापूर: दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी सायंकाळी सहा वाजता गंगाई हॉल फुलेवाडी रिंग रोड कोल्हापूर येथे सामाजिक कार्मयकर्कते विजयसिंह उर्फ रिंकू देसाई आयोजित मकर संक्राती व 26 जानेवारी निमित्त खास महिलांसाठी हळदीकुंकू चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी महिलांनी उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाचे नेटके नियोजन सौ श्रद्धा विजयसिंह देसाई व श्री विजयसिंह उर्फ रिंकू देसाई यांनी केले होते.या कार्यक्रमा वेळी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्ष राणीताई पाटील या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या.त्यांनी महिलांना महिलांचे कर्तव्य व जबाबदारी याबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केले.पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करत असते.त्या यावेळी अशा म्हणाल्या की,सगळ्यात आधी सकाळी लवकर स्त्री उठते त्यानंतर कुटुंब उठते.घरातील सर्व कामाची जबाबदारी तिच्या खांद्यावर असते.आणि ती प्रामाणिकपणे जबाबदारी सांभाळत असते.प्रत्येक स्त्रीने आपल्या स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे.समाजापुढे तिने आपलं स्वतःचं अस्तित्व प्रस्थापित केले पाहिजे.असे त्या कार्यक्रमा वेळी बोलल्या.

या कार्यक्रमा वेळी प्रमुख पाहुण्या सरपंच परिषद अध्यक्ष राणीताई पाटील, एसपी नाईन निर्भया वुमन असोसिएशनच्या व्यवस्थापकीय संचालिका प्राध्यापक मेघा पाटील, उद्योजिका रुद्राक्ष अमृत चव्हाण व सरपंच ज्ञानसेवा पाटील या सर्व प्रमुख पाहुण्यांचा सत्कार सौ श्रद्धा विजयसिंह देसाई यांच्या हस्ते करण्यात आला.

बोंद्रे नगर रिंग रोड भागामध्ये सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई यांचे फार मोठे योगदान आहे.ते या भागामध्ये बरेच विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.प्रत्येक हाकेला जाणारा सामाजिक कार्यकर्ता म्हणून या फुलेवाडी बोंद्रे नगर भागामध्ये आपले स्वतःचे नाव प्रस्थापित केले आहे.प्रत्येकाच्या सुखात दुःखात सदैव अग्रेसर असणारे सामाजिक कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे.येत्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक या पदाचे नेतृत्व करण्यास इच्छुक आहेत.महिलांसाठी अनेक उपक्रम ते सतत राबवत असतात.या हळदी कुंकू कार्यक्रमा वेळी मकर संक्रांतीचे गिफ्ट व नाश्त्याची सोय केली होती.या कार्यक्रमा वेळी भागातील नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.




