आमदार चंद्रदीप नरके यांचा गणेश पार्क येथे नागरी सत्कार….

0
203

SP-9 प्रतिनिधी: मेघा पाटील

कोल्हापूर : फुलेवाडी येथील गणेश पार्क येते आमदार चंद्रदीप नरके यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी गणेश पार्क येथील नागरिकांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या. कचरा, पाणी, स्ट्रीट लाईट व रस्ते या संदर्भातील समस्यावर लवकरच तोडगा काढू अशी त्यांनी यावेळी ग्वाही दिली. आमदार फंडातून विशेष फंडसाठी मागणी करावी लागेल. ते यावेळी असे म्हणाले की जिथे आपण एखादा प्लॉट घेतो तिथे पहिल्यांदा लाईट पाणी रस्ते आणि गटर हे कलेक्टर NA प्लॉट खरेदी करताना या सर्व सोयी असतानाच आपण प्लॉट व घर खरेदी करावयाचे असते. आपण सुरुवातीला प्लॉट – घर घेतो व घर बांधून झाल्यानंतर समस्यांना सामोरे जातो. मग या सर्व समस्या लोकप्रतिनिधी व ग्रामपंचायतीवर येऊन पडतात. गणेश पार्क येथे 561 प्लॉट आहेत. या 561 प्लॉट धारकापैकी बोटावर मोजण्या इतकेच मतदार या भागामध्ये राहतात व बाकीचे सर्व मतदान आपापल्या गावी आहेत. पण इथे कमीत कमी पंधराशे मतदान नोंदणी झाली पाहिजे. त्यावेळेस स्थानिक आमदार फंडातून या समस्यावर खर्च करून या समस्या सोडवता येतील.

प्रथम या भागातील सर्व नागरिकांनी कोल्हापूर महानगरपालिकेला पाणी कनेक्शन साठी अर्ज करून घ्यावेत . कचऱ्याच्या समस्येसाठी घंटागाडी ग्रामपंचायतला मी माझ्या आमदार फंडातून देतो. त्याचबरोबर लाईटचेही समस्या तिसरी लाईन टाकून आपण समस्या लवकरच सोडवू असे यावेळी ते म्हणाले.यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांचा सत्कार गणेश पार्क मधील जेष्ठ नागरिक सर्जेराव गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाई यांचा सत्कार अनिल कदम यांच्या हस्ते करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र दिवसे यांचा सत्कार उत्तम कमलाकर यांच्या हस्ते करण्यात आला. समीर पवार यांचा सत्कार संजय गवळी यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी गणेश पार्क येथील नागरिक व भागातील नागरिक यांच्यावतीने समस्याचे निवेदन आमदार चंद्रदीप नरके यांना दिले. यावेळी चंद्रदीप नरके यांनी लवकरच आपण या समस्याचा पाठपुरावा करू आणि प्रश्न मार्गी लावू अशी ग्वाही यावेळी त्यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रस्ताविक महेश कापसे यांनी यावेळी केले. गणेश पार्क येथील सर्व नागरिक व भागातील नागरिक या कार्यक्रमा वेळी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here