SP-9 न्यूज प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर – महाराष्ट्रात लवकरच येणाऱ्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका संदर्भात महाविकास आघाडीच्या घटक पक्ष सामंजस्याने आणि चर्चे मधून भूमिका ठरवतील , दोन दिवसापूर्वीच या संदर्भाने उद्धव ठाकरे यांनी आपली भेट घेतली होती अशी माहिती राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी दिली कोल्हापुरात ते सकाळी पत्रकारांशी बोलत होते . नितेश कुमार यांच्या बिहारमधील भाजपाचा पाठिंबा काढून घेण्याच्या भूमिकेचा केंद्र शासनावर कोण सध्या तरी कोणता परिणाम होणार नाही असे मत त्यांनी नोंदवले .मराठा आरक्षण संदर्भात पुन मनोज जरांगे उपोषणास बसत आहेत याविषयी आपली भूमिका काय ? या प्रश्नावर त्यांनी या संदर्भात आपणास आपण माहिती घेत असल्याची त्यांनी सांगितले . मुंबई महानगरपालिका निवडणूक संदर्भात त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या सभांना मोठी गर्दी लाभत असल्याचेही मत नोंदवले . कोल्हापूर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या भाजप नेते अमित शहा यांच्या भूमिकेकडे त्यांच्या आमचे लक्ष असल्याचे शेवटी त्यांनी नमूद केले .यावेळी त्यांच्यासमवेत संबंधित समरजिंतसिंह घाटगे ,व्ही बी पाटील , माजी महापौर आर के पवार , अनिल घाटगे आदी पदाधिकारी होते .