राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत पाणी फवारणी व धूलीकण कमी करणाऱ्या आत्याधुनिक वाहनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण

0
300

एस पी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील

कोल्हापूर, दि. 2 : बहुउद्देशीय स्प्रेअर आणि डस्ट सप्रेशन वाहनाचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर व सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ यांच्या हस्ते आज लोकार्पण करण्यात आले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात झालेल्या लोकार्पण कार्यक्रमावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, खासदार शाहु महाराज छत्रपती, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार अमल महाडिक, चंद्रदीप नरके, डॉ. अशोकराव माने, राहूल आवाडे, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त डॉ. के.मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, सहा.आयुक्त संजय सरनाईक, जल अभियंता हर्षजित घाटगे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे आदी उपस्थित होते.राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत प्राप्त निधीमधून वाहन खरेदी करण्यात आले असून यासाठी 1 कोटी 32 लाख इतका खर्च आला आहे. वॉटर मिस्ट सिस्टम वापरुन वातावरणातील धूलीकण सेप्रेशन करणे, रस्ते स्वच्छ करण्यासाठी पाणी मारणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, रोडवर पाणी स्प्रिकिंग करणे, रोड डिव्हायडर क्लिनिंग करणे, ग्रीन बेल्ट शॉवर सिस्टिम, डिव्हायडर मधील झाडांना पाणी मारणे यासाठी याचा चांगला उपयोग होणार आहे हाय ट्री वॉटर सिस्टिम आणि तातडीच्या कालावधीमध्ये फायर फायटरसाठी वाहनाचा वापर केला जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here