नूतनीकरण केलेल्या जिल्हाधिकारी दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन

0
188

एसपी नाईन प्रतिनिधी रोहित डवरी

कोल्हापूर, दि. 2: जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हाधिकारी यांच्या सुसज्ज दालनाचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. या नूतनीकरण केलेल्या दालनासह राजर्षी शाहू सभागृह, अभ्यागतांसाठी प्रतिक्षा कक्ष व स्वीय सहायक कक्षाचेही नूतनीकरण करण्यात आले आहे. यावेळी नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास, औकाफ राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ, खासदार छत्रपती शाहु महाराज, खासदार धैर्यशील माने, सर्वश्री आमदार चंद्रदीप नरके, अमल महाडिक, डॉ. अशोकराव माने, शिवाजी पाटील, जिल्हाधिकारी अमोल येडगे, महापालिका आयुक्त के. मंजूलक्ष्मी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here