वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत-विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

0
54

प्रतिनिधी श्रीकांत शिंगे

*कोल्हापूर, दि. 3 : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ अंतर्गत पैलवान कै. मारुती चव्हाण – वडार आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) व राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ (उपकंपनी) तसेच वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मुख्य कंपनी) कोल्हापूर या कार्यालयामार्फत 1 लाख रुपये थेट कर्ज योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या आर्थिक वर्षाचे उद्दिष्ट प्राप्त झाले असून 1 लाख थेट कर्ज योजनेमध्ये संपूर्ण कर्ज महामंडळाकडून दिले जाणार असून विमुक्त जाती व भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील लोकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक किरण गिऱ्हे यांनी केले आहे.2 हजार 85 रुपयांचे नियमित 48 समान मासिक हप्त्यामध्ये परतफेड करणाऱ्या लाभार्थीना व्याज अदा करावे लागणार नाही. परंतु थकीत हप्त्यावर द.सा.द.शे. 4 टक्के व्याजदर आकारण्यात येईल. (नियम व अटी लागू) अधिक माहितीसाठी महामंडळाचे कोल्हापूर जिल्हा कार्यालय वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या.) डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, 3 रा मजला, खो.क्र. 2 विचारे माळ (कावळा नाका) ताराराणी चौक, कोल्हापूर, दूरध्वनी क्र. 0231-2662313 वर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here