प्रतिनिधी रोहित डवरी
कोल्हापूर, दि. 3: जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर व राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत नुकताच बेरोजगार उमेदवारांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा संपन्न झाला. मेळाव्याचे उद्घाटन दिप प्रज्वलन करुन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एम.आर. बहिरशेट, स.प्र. सल्लागार, BTRI विभाग यांनी केले. मेळाव्यास वाय.बी. पाटील, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी, श्री. संग्राम पाटील IMC चेअरमन यांची प्रमुख उपस्थिती होती. एम.एस. आवटे, प्राचार्य, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, कोल्हापूर व श्री. जमीर करीम, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कोल्हापूर यांनी उपस्थित उमेदवारांना मार्गदर्शन केलेमेळाव्यात एकूण २४ उद्योजकांनी ६२८ रिक्तपदांसाठी सहभाग नोंदविला. मेळाव्यास २०४ उमेदवार उपस्थित होते. विविध पदांसाठी २६७ उमेदवारांनी मुलाखती दिल्या. त्यापैकी १७८ उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बी.आर. घोरपडे, क.प्र. सल्लागार यांनी केले तर एस.एस. माने. शिल्पनिदेशक यानी उपस्थितांचे आभार मानले.