
प्रतिनिधी मेघा पाटील
कोल्हापूर: सायबर ट्रस्ट संचलित कॉलेज ऑफ नॉन-कन्व्हेन्शल व्होकेशनल कोर्सेस फॉर वूमेन,कोल्हापूर येथे 4 फेब्रुवारी 2025 रोजी पालक मेळावा घेण्यात आला. प्राचार्य डॉ. आर.जी.कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यां मधील उद्ममशीलतेला वाव देणारे शिक्षण महाविद्यालयातआहे व ते त्यांच्या प्रदर्शनातून सिद्ध होत आहे असे नमूद केले. निलम जिरगे फूड टेक्नॉलॉजी,प्रज्ञा कापडी फॅशन डिझाईन, सीमा पाटील इंटेरियर डिझाइन,प्रियांका चव्हाण पर्यावरण शास्त्र या विभाग प्रमुखांनी आणि कॉमर्स विभागातर्फे उमेमसीरा रहिमतपुरे यांनी महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध शैक्षणिक उपक्रमांची माहिती पालकांना दिली.पालकांनी शिक्षकांसोबत संवाद साधला. रितिका चंदवाणी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. श्वेता शहा यांनी उपस्थितांचे आभार मानले.या वेळी सुमारे 100 पालक उपस्थित होते.या कार्यक्रमास महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर. जी कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे अध्यक्ष व कार्यकारी विश्वस्त डॉ.आर.ए.शिंदे व संस्थेचे सचिव सी.ए.ऋषिकेश शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.