
प्रतिनिधी मेघा पाटील
नाशिक: हळदी कुंकू व सन्मान नारी शक्तीचा”स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर” ही संकल्पना मनात ठेवून अध्यक्ष स्नेहल देव, नमस्ते नाशिक फाउंडेशन यांच्यातर्फे हळदी कुंकवाचा वाण म्हणून कचऱ्याची पेटी…अध्यक्ष स्नेहल देव यांच्या नमस्ते नाशिक फाउंडेशन नाशिक तर्फे आयोजित वाडीवर्हे येथे “सौभाग्याचे लेणी” हळदीकुंकू समारंभ मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला .यावेळी आजूबाजूच्या परिसरातील जवळपास दीडशेहून अधिक महिलांनी आपली उपस्थिती दर्शवून हळदीकुंकू समारंभाचा आनंद घेतला. सर्वप्रथम कर्नल मच्छिंद्र शिरसाठ यांच्या हस्ते सरस्वतीचे पूजन करण्यात आले त्यानंतर नमस्ते नाशिक फाउंडेशनचे अध्यक्ष स्नेहल देव यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले, स्नेहल देव यांनी “स्वच्छ सुंदर परिसर जीवन निरोगी निरंतर” ही संकल्पना मनात ठेवून, महिला सशक्तीकरण स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यावर भर देत सर्व गावातील महिलांना वाणस्वरूपी कचऱ्याची पेटी देण्याचा मानस ठेवला व सर्व महिलांना कचऱ्याची पेटी देण्यात आली .ही वस्तू आपल्याला मिळणार याचा आनंद सर्व महिलांच्या चेहऱ्यावर दिसून येत होता.

होतकरू व कष्टकरी महिला ज्या कुटुंब सांभाळून व्यवसाय करतात यांचा विशेष सत्कार करण्यात आला, वृक्ष लावा पावलोपावली तर मिळेल उन्हात सावली ही संकल्पना नमस्ते नाशिक फाउंडेशन राबवत असतो.त्या दृष्टीने गावातील विविध भागात महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले, स्नेहल देव फ्रेंड सर्कलच्या सिने अभिनेत्री सुप्रसिद्ध मॉडेल व सेल्फ डिफेन्स ट्रेनर कु. रूपाली पवार, मेकअप आर्टिस्ट आशा महाजन, ज्वेलरी मेकर सौ.भाग्यश्री कदम, सिनियर असोसिएट शीतल राजेंद्र पाटील ,अरिहंत टुर्स ओनर सपना जैन, सौ.प्रतिभा सुर्यवंशी, सौ अलका देव, सौ प्रतिभा कोतकर, मंजिरी घन,बच्छाव मॅडम, सरला जडे, वैशाली पाटकर, ललिता ततार, श्री कोतकर ,श्री सुभाष देव ,हास्य प्रेमी सौ. कविता पवार, स्मिता धासे, सौ अलका येवले, आदी महिलांच्या हस्ते सर्व गावातील महिलांना हळदीकुंकू चे वाण देण्यात आले, यावेळेस कार्यक्रमास इगतपुरी त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार श्री. हिरामण दादा खोसकर यांचे पुतणे श्री. भास्कर भाऊ खोसकर, वाडीव-हे गावचे मा. सरपंच श्री .रोहिदास भाऊ कातोरे, मा. सरपंच श्री. रावसाहेब आप्पा मा. उपसरपंच श्री. बाणेश्वर आप्पा मालुंजकर, उपसरपंच श्री. प्रवीण भाऊ मालुंजकर, वाडीव.हे विविध कार्यकारी सोसायटीचे नवनिर्वाचित चेअरमन श्री. दत्ताभाऊ कातोरे तटामुक्ती अध्यक्ष श्री.गणपत दिवटे, वाडीव.हे गावचे मा सदस्य श्री. माणिक भाऊ मुतडक, श्री. भीमा तात्या मालुजकर, मा.व्हा चेअरमन श्री. भाऊसाहेब मालुंजकर, श्री. दिगंबर कातोरे, सदस्य श्री. दिलीप मालुजकर, पै. मोहन भाऊ कातोरे, श्री. प्रभाकर रणमाळे, पै. नारायण कातोरे, श्री. शरद आप्पा मालुंजकर, मा. सदस्य श्री. गोविंद चहादु डगळे, मा. सदस्य श्री. रामदास चारोस्कर, मा. सदस्या, अलका गोविंद डगळे, श्री. गणेश मुतडक, मा. सदस्य, राजेश घोटे, श्री. रोहिदास लहांगे, श्री. हरी लहांगे, श्री. सुरेश कोरडे, श्री. अजय डगळे, श्री. किरण डगळे, श्री. हरी चारोस्कर, श्री. एकनाथ लहांगे, श्री. अशोक झोंबाड, जिल्हा परिषद सदस्य गोरख बोडके आदी मान्यवर उपस्थित होते.