प्रतिनिधी रोहित डवरी
छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्रातील राष्ट्रपुरुषांचा वेळोवेळी अपमान करण्याची जणू काही एका पक्ष व त्यांच्या समर्थकांच्यामध्ये स्पर्धा सुरू असताना आपण अस काही बोललोच नाही असा पवित्रा घेत काही वाचाळ वीरांना सोयीस्करित्या सांभाळण्याचं धोरण काही पक्ष व त्यांचं नेतृत्व आहे हे दुर्दैवाने म्हणावं लागेल .ज्या शककर्ते छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदुत्वाची मुहूर्तमेढ रोवत हा महाराष्ट्र स्वाभिमानी बनवला ज्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रत्येक गोष्टी घटना या आजही नव्हे तर यापुढेही शतकोत्तर वर्षात सुद्धा अंगावर रोमांच उठवणाऱ्या व इतिहासाला साक्षीदार त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अंगावर रोमांच उभा करणारा औरंगजेबाच्या तावडीतून अत्यंत शिफातीन व मुस्सदीगिरीन झालेली आग्र्याची सुटका असताना सुद्धा हा छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याहून लाच देऊन सुटले अशाप्रकारे वाचाळ व असंबद्ध पद्धतीने मुलाखती हा तथाकथित व्याख्यानकार अभिनेता राहुल सोलापूरकर देतो …आणि त्याच्या या विधानाचा निषेध सुद्धा आक्रोश मोर्चे काढणाऱ्या हिंदुत्ववादी तथाकथित संघटना करत नाहीत. शासन त्याच्यावर कोणतीही कारवाई करत नाही ..या अळीमिळी गुपचिळी पाठीमागे नेमकं शासनाचं व प्रशासनाचे काय धोरण आहे असा सवाल शिवसैनिक व महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता विचारत आहे ..गेली कित्येक दिवस छत्रपती शिवाजी महाराजांच्या वैभवशाली चारित्र्यवान इतिहासावर शिंतोडे उडवण्याची स्पर्धाच सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांच्यात चालू असताना आता यात या राहुल सोलापूरकर यांनी अशी बेजबाबदार विधान करून नेमकं छत्रपतींच्या प्रती कुठला आदर व्यक्त केलेला आहे.. हे अनाकलनीय व निषेर्धात आहे एखादी गोष्ट बोलल्यानंतर आणी ते अंगावर आल्यानंतर त्याची सारवासारव करत माफी मागणे हे आता लोकांच्या सवयीचं झालेलं आहे .तरी देखील अशा प्रकारची कृती नेमकी घडतातच का? महाराष्ट्रामधील या स्वाभिमानी युगपुरुष श्रीमंत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल अनुद्गार काढत आपापल्या पद्धतीने वेगवेगळी इतिहासाची मांडणी करत अस वक्तव्य करण्याचे धारिष्ट या लोकांना होतेच कसं?? वस्तूता राहुल सोलापूरकर यांनी या प्रचंड जनप्रक्षोभ झाल्यानंतर व सर्व स्तरावर ती निषेधाची भूमिका महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनतेने घेतल्यानंतर या वक्तव्याची माफी जरी मागितली असली तरी सुद्धा त्यांच्यावर हा द्रोहाचा गुन्हा नोंद झालाच पाहीजे ….. आपल्या आवजवी बुध्दीची दिवाळखोरी प्रदर्शित करत मुलाखतीमध्ये अथवा व्याख्यानामध्ये अशा प्रकारची वक्तव्य करून जर महाराष्ट्रातील शांतता अबाधित राहिलेली जर या तथाकथित पुरोगामी विचारवंतांना जर सहन होत नसेल तर मात्र यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उचलणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या करवीर नगरीमध्ये राहुल सोलापूरकर यांचं कुठलंही व्याख्यान कुठल्याही संघटनेला अथवा संस्थांना यापुढे शिवसेना आयोजित करून देणार नाही.. जोपर्यंत राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा नोंद होत नाही तोपर्यंत शिवसेनेतर्फे सोलापूरकर यांचे प्रत्येक कार्यक्रम उधळून लावले जातील.. शिवाजी महाराज हा हिंदुत्वाचा प्राण असून महाराष्ट्राचा श्वास आहे ही भूमिका सर्वच राज्यकर्त्यांना मान्य असेल तर सत्ताधार्यांनी त्वरित राहुल सोलापूरकर यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक करावी अन्यथा शिवसेना -उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पद्धतीने राहुल सोलापूरकर यांचा योग्य समाचार घेण्यात येईल