भाजपा पुणे जिल्ह्याच्या संपर्कमंत्री पदी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची निवड

0
40

एस पी नाईन प्रतिनिधी मेघा पाटील

मुंबई : भारतीय जनता पार्टीचे सदस्यता नोंदणी अभियान राज्यभरात उत्साहात सुरू असून राज्यातील लाखो कार्यकर्ते या अभियानाच्या माध्यमातून सदस्यता नोंदणी करत आहेत. यानिमित्ताने काल श्रीमती ना. दा. ठाकरसी महिला विद्यापीठाच्या पाटकर सभागृह, मुंबई येथे संघटन पर्व अभियानांतर्गत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे मंत्रिमंडळातील मंत्री, भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते उपस्थित होते.या कार्यक्रमात राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची पुणे जिल्ह्याच्या संपर्क मंत्री पदी निवड करण्यात आली आहे. सदस्यता नोंदणी अभियानात कोथरूड मतदारसंघाने दिलेल्या उद्दिष्टापेक्षा अधिक नोंदणी केली असून राज्यात सदस्य नोंदणीमध्ये कोथरूड मतदारसंघ महाराष्ट्रात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी अभिनंदन केलेयावेळी सक्रिय सदस्य म्हणून फॉर्म भरून पाटील यांनी नोंदणी देखील केली. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा राष्ट्रीय सह संघटन मंत्री शिवप्रकाश, महसूल मंत्री आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे, माहिती-तंत्रज्ञान व सांस्कृतिक मंत्री आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, विधान परिषदेचे गटनेते प्रवीण दरेकर यांच्यासह राज्यातील सर्व मंत्री, आमदार, खासदार आणि पदाधिकारी उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here